Dayanand Education Society's

Dayanand College of Arts, Latur

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

Online Registration

Online Registration

दयानंद कला महाविद्यालय, लातूर
सूचना
पदवी प्रथम वर्ष प्रवेश

महाविद्यालयातील पदवी प्रथम वर्षाकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
महाविद्यालयाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील सूचनेप्रमाणे व वेळापत्रकानुसार https://daclatur.org या संकेतस्थळावर राबविण्यात येईल.

ऑनलाईन प्रवेशाकरिता पुढील प्रमाणे कार्यवाही करावी
१) इच्छुक, पात्र विद्यार्थ्यांनी https://enrollonline.co.in/Registration/Apply/DACL या लिंकवर क्लिक करून प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करावी.
२) स्वतःचा ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून Online Registration करावे.
३) प्राप्त झालेल्या User Name व Passward वापरून प्रवेशाबाबत आवेदनपत्र (Admission Form) संपूर्ण बिनचूक भरावे.
४) महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर (Website) प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश व इतर शुल्क ऑनलाईन पद्धतीनुसार भरल्यानंतर विद्यार्थ्यांचा तात्पुरता प्रवेश निश्चित होईल.
५) लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर प्रवेशाची आवश्यक मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष महाविद्यालयात दाखल करून रितसर पावती घ्यावी. (मूळ कागदपत्र दाखल केल्याशिवाय अंतिम प्रवेश गृहीत धरला जाणार नाही.)

ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र भरताना खालील माहिती सोबत असावी.
१.)Soft copy of Passport Photo and Signature in JPEG Format
२.) आधार कार्ड क्रमांक
३.) बारावी उत्तीर्ण गुणपत्रिका, व शाळा सोडल्याचा दाखला. (टी. सी.) शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर फक्त गुणपत्रिका.
४.) सामाजिक / आर्थिक आरक्षणाची आवश्यक कागदपत्रे जसे जातीचा दाखला (अनिवार्य), जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट (उपलब्ध असेल तर)

• बी.ए. (अनुदानित, विनाअनुदानित)
• बी.ए. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस (विनाअनुदानित)
• बी.ए. ॲॅनिमेशन ॲण्ड वेब डिझाईन (विनाअनुदानित)
• बी.ए. फॅशन डिझाईन (विनाअनुदानित)
या वर्गांना प्रवेश देणे सुरु आहे .

ऑनलाईन नोंदणी माहिती बाबत अडचण असल्यास खालील सदस्यांशी संपर्क साधावा.
• श्री. नंदकिशोर खंडेलवाल 9881422332
• श्री वसिष्ठ कुलकर्णी 7588119346
• श्री विकास खोगरे 9850896465

अधिक माहितीसाठी खालील प्रवेश समिती प्रमुख व अन्य सदस्याशी संपर्क साधावा.
• बी.ए. (अनुदानित, विनाअनुदानित) – डॉ. सुनील साळूंके 9960772572
• बी.ए. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस – डॉ. सुभाष कदम 9834821671
• बी.ए. ॲॅनिमेशन ॲण्ड वेब डिझाईन – प्रा. दुर्गा शर्मा 9545205999
• बी.ए. फॅशन डिझाईन – प्रा.सुवर्णा लवंद 9860824933

* वरील सर्व प्रवेशांसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
* नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येईल.
* आता केवळ नोंदणी प्रकिया सुरु आहे.
* स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सूचनेनुसार अंतिम प्रवेशासाठीचे वेळापत्रक, प्रवेशाच्या तारखा कळविण्यात येतील.

– डॉ.शिवाजी गायकवाड
प्राचार्य

Skip to content