अॅनिमेशन मधील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, भरगोस असा प्रतिसाथ मिळाला. नूतन प्रथम प्रवेशित विद्यार्थ्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. अॅनिमेशनमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलात्मक व्हिडीओ बनवून कोरोना जनजागृती विभागातर्फे करण्यात आली. यावर्षी ऑनलाईन स्वरूपामध्ये कसे सोप्या व सरळ पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत सर्व विषयांचे थेअरी आणि प्रॅक्टिकल त्यांना कसे समजतील याची काळजी घेऊन ऑनलाईन तासिका घेण्यात आल्या. अॅनिमेशन विभागामध्ये “व्ही एफ एक्स एक्सपीरियन्स कॅनडा एमएनसी ” या विषयावर कॅनडा बेसड कंपनीमध्ये रुजू झालेली तसेच ७ वर्षाचा कॉर्पोरेटमधील अनुभव मांडण्यासाठी माजी विद्यार्थिनी श्रीमती पूर्वा शाह -जैन ह्यांनी २४ जुलै २०२१ रोजी झूम प्लॅटफॉर्म वर एकदिवसीय वेबिनार घेण्यात आला त्यामध्ये अहोरात्र परिश्रम करून आपण पुढे कशे जाऊ शकतो, कोरोना काळात खचून न जात आपल्या स्किलचा उपयोग करून कसे कार्य करू शकता व काम करताना आपल्या अॅ्निमेशनमधील पदवीचा कसा फायदा होतो, किशोर वयात शिकत असताना आपण काय चुका करतो व त्या करू नका असा सल्ला हि तिने विध्यार्थांशी सवांद साधताना दिला, या कार्यक्रमामध्ये आजी व माजी विध्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
समाजाने पारंपरिक शिक्षणासोबत कोशल्य आधारित शिक्षणाकडे वाटचाल करावी तसेच अॅनिमेशन बद्दल जनजागृती व्हावी या हेतूने “अॅनिमेशनमधील करियरच्या संधी” या विषयावर महाविद्यालयामध्ये अॅनिमेशनच्या स्टाफने वेबिनार घेतले त्यामध्ये मुक्तेश्वर महाविद्यालय, औसा तसेच इनर व्हील क्लब लातूर, अंबाजोगाई, अहमद्पुर, चाकूर आणि औसा यांच्यासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजी व अॅनिमेशनमधील कौशल्य कश्या प्रकारे अंगीकृत करून लगेचच विध्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो याबद्दल सखोल अशे मार्गदर्शन करण्यात आले या वेबिनारसाठी विध्यार्थ्यानी आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शिविली
तसेच या पॅनडॅमिक काळात विध्यार्थ्यानी ऑनलाईन शिक्षण घेऊन लगेचच जॉबसाठी कंपनीमध्ये जॉईन झाले त्यामध्ये अविनाश गाढवे, इलेक्स स्टुडिओ पुणे , निकिता गंगथडे, टुटोरूट कंपनी हैदराबाद , प्रेमांशी जोईश्चर द आरडोर ग्राफिक्स डिझाइनर, मुंबई ह्यांनी आपल्या कॅरीरची यशस्वी सुरुवात केली. वर्षा अखेर तृतीय वर्षाच्या विध्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप दिला गेला.