अॅनिमेशन विभाग अहवाल 19-2020
अॅनिमेशन मधील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, भरगोस असा प्रतिसाथ मिळाला. व्दितीय आणि तृतीय वर्षाच्या विध्यार्थ्यांनी नूतन प्रथम प्रवेशित विध्यार्थ्यांना फ्रेशर्स पार्टी देऊन त्यांचे स्वागत केले. नंतर अॅनिमेशन विभागामध्ये दि. ३ व ४ सप्टेंबर २०१९ रोजी “कोलाज मेकिंग” या विषयावर प्रसिद्ध चित्रकार प्रा. किशोर शिखरे यांची कार्यशाळा विध्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून आयोजित करण्यात आली. त्याचसोबत २४ सप्टेंबर २०१९ रोजी प्रा. संतोष पाठारे सिने अभ्यासक सचिव प्रभात चित्र मंडळ, मुंबई यांचे “डिफरेन्ट पर्स्पेक्टिव्हस ऑफ सिनेमाज अँड अबाऊट स्क्रिप्ट रायटिंग” या विषयावर मार्गदर्शन आणि मूवी सेशन ठेवण्यात आले कार्यक्रमास विध्यार्थ्यानी चांगला प्रतिसाथ दिला त्यामुळे कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.
समाजाने पारंपरिक शिक्षणासोबत कोशल्य आधारित शिक्षणाकडे वाटचाल करावी या हेतूने अॅनिमेशन बद्दल जनजागृती व्हावी या हेतूने “अॅनिमेशनमधील करियरच्या संधी” या विषयावर वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये अॅनिमेशनच्या स्टाफने सेमिनार घेतले त्यामध्ये मुक्तेश्वर महाविद्यालय, औसा, जैक्रांती महाविद्यालय,लातूर, वेंकटेश महाविद्यालय,लातूर, शिवाजी महाविद्यालय,लातूर या ठिकाणी प्रेझेंटेशन्स दिले व अॅनिमेशनमधील कौशल्य कश्या प्रकारे अंगीकृत करून लगेचच विध्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो याबद्दल सखोल अशे मार्गदर्शन करण्यात आले या सेमिनारसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता.
मिस सपना मदने कॉ-फाउंडर यायिन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी “अॅनिमेशनमधील ग्रेट फ्युचर” या विषयावर अॅनिमेशनमधील सर्व विध्यार्थ्यांसाठी सेमिनार दिले त्यांच्या व्यवसायिक अनुभवाचा सार त्यांनी त्याच्या बोलणीतून सांगितला.
अॅनिमेशनमधील प्रथम, व्दितीय व तृतीय वर्ष्याच्या विध्यार्थ्यांची सहल हैद्राबाद- रामोजी फिल्म सिटी येथे २१ जाने ते २३ जाने या कालावधीमध्ये गेली होती. या सहली दरम्यान अॅनिमेशनमधील दोन माजी विध्यार्थी श्री. सुरज पांचाळ, सिनियर रोटो आर्टिस्ट व श्री. अखिब शेख सिनियर रोटो आर्टिस्ट जे हैद्राबादमधील रोटोमकेर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत आहेत यांनी आजी विद्यार्थ्यंना सेमिनार दिला, त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर म्हणून एखाद्या कंपनीमध्ये रुजू होता त्यावेळेस कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते तसेच अहोरात्र परिश्रम करून आपण पुढे कशे जाऊ शकतो, काम करताना आपल्या अॅनिमेशनमधील पदवीचा कसा फायदा होतो, किशोर वयात शिकत असताना आपण काय चुका करतो व त्या करू नका असा सल्ला हि त्यांनी विध्यार्थांशी सवांद साधताना दिला. वर्षा अखेर तृतीय वर्षाच्या विध्यार्थ्यांना निरोप दिला गेला.
फोटो कॅप्शन :- जैक्रांती महाविद्यालय,लातूर येथे “अॅनिमेशनमधील करियरच्या संधी” या विषयावर सेमिनार देताना अॅनिमेशन विभागप्रमुख प्रा. दुर्गा शर्मा व समवेत प्रा. संतोष काकडे, प्रा. इरफान शेख व प्रा. मंगेश रापते
फोटो कॅप्शन :- २४ सप्टेंबर २०१९ रोजी “डिफरेन्ट पर्स्पेक्टिव्हस ऑफ सिनेमाज अँड अबाऊट स्क्रिप्ट रायटिंग” या सेमिनारचे उदघाटन प्रसंगी डावीकडून अभिजात फिल्म सोसाटीचे सचिव श्री श्याम जैन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील, द. क. म. प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड,मार्गदर्शक प्रा. संतोषजी पाठारे, अॅनिमेशन विभाग प्रमुख प्रा. दुर्गा शर्मा, अभिजात फिल्म सोसाटीचे उपाध्यक्ष डॉ. स्वप्नील देशमुख व श्री अभिजीत भूमकर
फोटो कॅप्शन :- अॅनिमेशन विभागाची शैक्षणिक सहल हैद्राबाद व रामोजी फिल्म सिटी येथे गेली होती तेथील चौमल्ला पॅलेसला भेट दिली त्यावेळस अॅनिमेशन स्टाफ व विद्यार्थी
फोटो कॅप्शन :- अॅनिमेशन विभागाची शैक्षणिक सहल हैद्राबाद व रामोजी फिल्म सिटी येथे गेली होती तेथील चौमल्ला पॅलेसला भेट दिली त्यावेळस अॅनिमेशन स्टाफ व विद्यार्थी
फोटो कॅप्शन :- अॅनिमेशन विभागाची शैक्षणिक सहल हैद्राबाद व रामोजी फिल्म सिटी येथे गेली होती तेथील स्नो वर्ल्ड चा आनंद घेताना अॅनिमेशन स्टाफ व विद्यार्थी
फोटो कॅप्शन :- अॅनिमेशन विभागाची शैक्षणिक सहल हैद्राबाद व रामोजी फिल्म सिटी येथे गेली होती त्यावेळी रोटोमकेर प्रायव्हेट लिमिटेड हैद्राबाद या कंपनीमध्ये मध्ये कार्य करत असलेला अॅनिमेशनमधील माजी विध्यार्थी श्री. सुरज पांचाळ, सिनियर रोटो आर्टिस्ट याने आजी विद्यार्ध्यांना मार्गदर्शन करताना व विध्यार्थी.