लातूर – दयानंद कला महाविद्यालयात नॅक संदर्भात महाविद्यालयाचा गुणात्मक विकास आणि नवीन मुल्यमापन पद्धती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यशाळेस साधन व्यक्ती म्हणुन यु.जी.सी व नॅक समिती सदस्य असलेले प्रा.डॉ. एन.एस.धर्माधिकारी (शि ाण
तज्ज्ञ, पूणे हे आले होते. नॅक ला सामोरे जाताना सकारात्मक क्रियाशिलता कशी महत्त्वाची असते हे त्यांनी सांगितले. त्यासाठी आपण विशेष कार्यप्रवणता, कामाची समर्पकता व सातत्य पाळले जाते हे सांगितले. नॅक क्रायटेरिया लिहताना त्यातले बारकावे नजरेस आणुन दिले. ‘तुजे आहे तुजपाशी, परि तू जागा विसरलाशी’ या उक्तीचा आधार घेत आपल्याकडे नाविन्यपूर्ण बाबी, उपक्रमशीलता असते पण काय? कोठे? चपखल बसते आणि ते सादर करता येते हे त्यांनी ल ाात आणून दिले. शेवटी आपल्या व्यवसायाचा अभिमान बाळगून कसोटी लावणा·या नॅक मूल्यमापनास आपण आत्मविश्वासाने सामोरे जावे अशा शुभेच्छा दिल्या. प्रस्तुत कार्यक्रमाचा अध्य ाीय समारोप करताना प्र.प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शि ाकेत्तर कर्मचारी कसे कार्य ाम आहे, उत्साहाने सांघिक उपक्रम ते राबवतात या बद्दल कौतुक केले. नॅक केवळ प्राचार्यांची परी ाा किंवा श्रेयस नसुन आपणा सर्व सहकार्यांचे ते श्रेयस आहे. असे म्हणत सकारात्मक उर्जा देत सहकार्याबद्दलचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत मानीकर यांनी केले, आभार प्रा.नितीन डोके यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शि ाकेत्तर कर्मचारी, इतर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.