दयानंद कलाला युवक महोत्सवात उपविजेतेपद
दि.26 सप्टेंबर-2019
लातूर – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या वतीने घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात दयानंद कला महाविद्यालयाने 28 कला प्रकारात सहभाग घेऊन 15 बक्षिसांची लयलुट केली. त्यात 8 सुवर्ण व 7 कास्यपदकांची कमया केली. नाटकाला 4 सुवर्ण पदके मिळाली. लोकसंगीत तालसुवर्ण पदक, जलसा सुवर्ण पदक, नक्कल सुवर्णपदक, आदिवाशी लोकनृत्य सुवर्ण पदक तर 7 कास्यपदक मिळवली. त्यात शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय सुरवाद्य, मुकाभिनय, लावणी, पोवाडा, कवाली, समुहगायन (भारतीय).
या यशाबद्दल संस्था अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी, संस्था सचिव मा. श्री. रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य (क.म.) अनिल माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे,, कार्यालयीन अधिक्षक श्री. नवनाथ भालेराव, श्री. रमेश देशमुख, श्री. विजय पारीक व सर्व प्राध्यापक वृंध व प्रशासकीय कर्मचारी यांनी या यशाबद्दल सर्व विद्यार्थी कलावंतांचे अभिनंदन केले. या यशासाठी समन्वयक प्रा. बालाजी घुटे, प्रा. डॉ. पुष्पलत्ता अग्रवाल, डॉ. देवेंद्र कुलकर्णी, डॉ. संदीप जगदाळे, प्रा. शरद पाडे व प्रा. शिवाजी राठोड, श्री. तेजश धुमाळ, श्री. गोविंद कांबळे, श्री. कृष्णा कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.