दयानंद कला अॅनिमेशन विभागात कोलाज वर्कशॉप संपन्न
दयानंद कला महाविद्यालयातील अॅनिमेशन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी ही कोलाज मेकिंग या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. या वर्कशॉपसाठी प्रसिद्ध चित्रकार प्रा. के. बी. शिखरे यांनी मार्गदर्शन केले.
या वर्कशॉपमध्ये प्रा. के. बी. शिखरे यांनी मार्गदर्शन करताना कोलज या कलाकृतीबद्दल विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. ज्यात काही कलापूर्ण कलाकृती विद्यार्थ्यांना तयार करून दाखविल्या. वर्तमान काळात नवनवीन कल्पक विचारांना जगात जी मुभा प्राप्त होत आहे, त्याचीच एक परिणिती म्हणजे कोलाज होय असे मत त्यांनी प्रतिपादन केले.
या प्रसंगी अॅनिमेशन विभाग प्रमुख प्रा. दूर्गा शर्मा यांनी विद्यार्थ्यांना अशा नवीन कलेच्या निर्मितीकरीता जिज्ञासक वृत्ती असणे आवश्यक असल्याबाबत नमूद केले. ज्या विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा असेल ते काही नवीन व कलात्मक कलाकृती तयार करण्याकरीता नेहमी एक पाऊल अग्रेसीत असतो असे मत त्यांनी व्यक्त केले.
या वर्कशॉपमध्ये अॅनिमेशनच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्सपूर्त सहभाग नोंदविला. सर्व शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते.