दयानंद कला महाविद्यालयात प्रदर्शनातुन मांडला भारताचा इतिहास
लातूर 30.08.2019 वार शुक्रवार रोजी दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे एक दिवशीय इतिहास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या कला शाखेच्या इतिहास (कनिष्ठ) विभागाच्या वतीने इतिहास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यात कोश,नाणी, नियतकालीके, विजाणू शास्त्रीय माध्यमे, ऐतिहासीक चित्र, ऐतिहासीक वेषभुषा इ. प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून इतिहास अधिक विस्तृतपणे, सहज विद्याथ्र्यांना समजण्यासाठी एक दिवशीय दुर्मिळ छायाचिंत्राचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. लक्ष्मीरमणजी लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, उपप्राचार्य ए.डी.माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, इतिहास विभागप्रमुख डॉ. रमेश पारवे, प्रा. विलास कोमटवाड, प्रा. अंजली बनसोडे उपस्थित होते.
प्रदर्शनात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा, वृत्तपत्रच्या प्रती, महत्वाच्या व्यक्तीची दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. तसेच इतिहास विभागातील शिक्षकांनी विद्याथ्र्यांना यावेळी मागदर्शन देखील केले. तसेच ऐतिहासिक व्यक्तींची वेशभूषा स्पर्धा ही आयोजीत केली गेली.
या प्रदर्शनात इ.12वी वर्गातील विद्याथ्र्यांनी ऐतिहासीक माहीतीचे बनवलेले तक्ते ठेवण्यात आले होते. या तक्त्याच्या माध्यमातून छायाचित्र व त्याची माहिती अधीक सुक्ष्मपणे विद्याथ्र्यांना निरक्षण करता आली. इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. विलास कोमटवाड व प्रा. अंजली बनसोडे यांनी विद्याथ्र्यांना मागदर्शन केले. व प्रमुख पाहुण्यांना सदर प्रदर्शनाबद्दल सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्रा. सुरेश क्षीरसागर, प्रा. शिवाजी राठोड, प्रा. सुधीर गाडवे, प्रा. डॉ. डी.बी. कुलकर्णी, यांचेही सहकार्य लाभले. या प्रदर्शनात महाविद्यालयातील सर्व विभागातील शिक्षक-विद्यार्थी शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा उत्स्फुर्त सहभाग पाहायला मिळाला. या प्रदर्शनाला 500 हुन अधीक विद्याथ्र्यांनी भेट दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. दिक्षा चव्हाण, कु. पूजा तेली यांनी केले तर आभार मनिष फुलारी याने मांडले.