Dayanand Education Society's

Dayanand College of Arts, Latur

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

दयानंद कला महाविद्यालयाच्या  प्र. प्राचार्यपदी डॉ. एस. पी. गायकवाड

दयानंद कला महाविद्यालयाच्या  प्र. प्राचार्यपदी डॉ. एस. पी. गायकवाड

दयानंद कला महाविद्यालयाच्या
प्र. प्राचार्यपदी डॉ. एस. पी. गायकवाड

लातूर – येथील दयानंद कला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्यपदी डॉ. एस. पी. गायकवाड यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज दि. ०६ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला.
डॉ. एस. पी. गायकवाड हे यापूर्वी याच महाविद्यालयात उपप्राचार्य पदावर कार्यरत होते. त्यांनी एकूण २७ वर्षे प्राध्यापक, विभाग प्रमुख, उपप्राचार्य, समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे दोन वेळा सदस्य व संशोधक मार्गदर्शक अशा विविध पदांवर कार्य केले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत एकूण ०६ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे. पदभार स्विकारल्यानंतर दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव श्री. रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव श्री. सुरेशजी जैन, नवनियुक्त प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्र.प्राचार्य पदावर नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. एस. पी. गायकवाड यांचे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक प्रा. दिलीप नागरगोजे, कार्यालयीन अधीक्षक श्री. नवनाथ भालेराव, मुख्य लिपीक श्री. रमेश देशमुख यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Skip to content