Dayanand Education Society's

Dayanand College of Arts, Latur

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

‘हिंदी जीवन मुल्यांची भाषा : डॉ. हणमंत पवार’

‘हिंदी जीवन मुल्यांची भाषा : डॉ. हणमंत पवार’

‘हिंदी जीवन मुल्यांची भाषा : डॉ. हणमंत पवार’
दि.14 सप्टेंबर-2019
लातूर – दयानंद कला महाविद्यालय, लातूर हिंदी दिवसाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा व शुध्द वर्तनी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धे मध्ये विजेत्या विद्याथ्र्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. हणमंत पवार उपस्थित होते. यावेळी हिंदी भाषेने साहित्याच्या माध्यमातून चांगले अनुकरणीय चरित्र, मुल्य, संस्कार, देशप्रेम, एकता व जीवन जगण्याची उमंग दिली आहे. व हिंदी भाषेचे वाढते महत्व या विषयावर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना दयानंद कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी हिंदी भाषेचे वाढते महत्व व हिंदी विषयात रोजगाराच्या संधी या विषयावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रदीप सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. विजय कांबळे, डॉ. विजय कुलकर्णी , डॉ. प्रणिता फड, डॉ. लीला कर्वा, डॉ. वनिता आग्रे, डॉ. शिवकांता सुरकुटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पुष्पलता अग्रवाल यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय पठाण हलिमा कलीम या विद्यार्थीनीने दिला. सुनील पवार, सोनाली कांबळे, शेख सद्दाम  इ. विद्याथ्र्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शेख तय्यबा झाक्रुद्दीन व आभार प्रदर्शन सय्यद खादर याने केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Skip to content