दयानंद कला महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा कायदा’
यावर कार्यशाळा संपन्न
दि.19 सप्टेंबर-2019
लातूर – दयानंद कला महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे ‘बौद्धिक संपदा कायदा’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जी. लक्ष्मण तसेच अॅड. मधुकर गिरी यांची उपस्थिती होती. कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड उपस्थित होते.
कार्यशाळेची सुरूवात डॉ. देवेंद्र कुलकर्णी यांनी अत्यंत सुरेल असे प्रेरणा गीत गाऊन केली. कार्यशाळेच्या सुरूवातीला संयोजक डॉ. अंजली जोशी यांनी बौद्धिक संपदा कायदा व त्याची वर्तमानकाळातील आवश्यकता प्रास्ताविकात मांडली. डॉ. मधुकर गिरी यांनी बौद्धिक संपदा कायद्यांची सविस्तर माहिती दिली. डॉ. जी. लक्ष्मण यांनी बौद्धिक संपदा कायद्याचे सविस्तर विश्लेषण करून याविषयीच्या व्यक्तीच्या हक्कांविषयी मार्गदर्शन केले. आपल्या समाजात बौद्धिक संपदा हक्क आणि कायदे याबाबत फारशी जागरूकता नाही, परंतु ही जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. बौद्धिक संपदा म्हणजे काय ते सांगून बौद्धिक संपदा कायद्यामध्ये कोणकोणत्या बाबी अंतर्भूत होतात, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेचा समारोप प्र.प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केला. त्यांनी बौद्धिक संपदा कायदा हा विषय कार्यशाळेसाठी निवडला गेला याबाबत आनंद व्यक्त केला आणि याविषयाची जागृती वाढली पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. गोपाल बाहेती यांनी केले तर आभार डॉ. सुभाष कदम यांनी मानले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.