दयानंद कला महाविद्यालयात गुणवत्ता सुधार कार्यक्रम संपन्न*
*लातूर*: येथील दयानंद कला महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागातर्फे गुणवत्ता सुधार कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रा एस पी गायकवाड सर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ गौरव जेवळीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा डॉ रामेश्वर खंदारे यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रा.डॉ. गौरव जेवळीकर सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की,विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करायला पाहिजे त्यानंतर वेळेचे नियोजन करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे वेळेचे महत्व समजावून सांगताना त्यांनी लोकप्रशासन विषयातील ल्युथर गुलीक यांचा पोस्डकॉर्ब सिद्धांत सांगून वेळेचे महत्त्व समजावून सांगितले तसेच लोकप्रशासन विषयाचे स्पर्धा परीक्षेत असलेले महत्त्व समजावून सांगितले .लोकप्रशासन विषयाचे महत्त्व समजावून सांगताना ते म्हणाले की, लोकप्रशासन हा केवळ अभ्यास विषय नसून उत्तम प्रशासकीय अधिकारी निर्माण करण्याचे ते केंद्र आहे तसेच आजच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात एखाद्या प्रशासकीय पदावर नियुक्त झाल्यास आपल्या पदाचा गैरवापर करू नये ते म्हणतात की, अधिकार हे व्यक्तीला नसून पदाला असतात त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने सामान्य व्यक्तीप्रमाणे राहून आपल्या अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर करावा.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एस पी गायकवाड सरांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले की, उच्च ध्येय ठेवून आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत .आजचा विद्यार्थी उद्याचा भावी प्रशासकीय अधिकारी आहे .त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतेही काम करत असताना अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करावे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयशा पठाण या विद्यार्थिनीने केले .यावेळी लोक प्रशासन विभागाचे विभाग प्रमुख प्रा डॉ रामेश्वर खंदारे प्रा डॉे उर्मिला रेड्डी प्रा.समुद्रे मॅडम प्रा .पवळे मॅडम प्रा. धायगुडे मॅडम, प्रा चैतन्य शिंदे सर,प्रा. कसबे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. उर्मिला रेड्डी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्णू चांदुरे,हनमंत चिंचोले मनोज आत्रम, शिवाजी पांचाळ,परमेश्वर कापसे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले