Dayanand Education Society's

Dayanand College of Arts, Latur

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

दयानंद कला महाविद्यालयात एनसीसी बी प्रमाणपत्राचे वाटप

दयानंद कला महाविद्यालयात एनसीसी बी प्रमाणपत्राचे वाटप

राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्रांमध्ये शील, शिस्त, संयम, निर्णयक्षमता, बुद्धी, एकोपा, समानता, राष्ट्राभिमान, उच्चविचारसरणी, ध्येयनिष्ठा, समयनिष्ठता, आज्ञाधारकपणा, इत्यादी गुणांचा विकास व्हावा यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना कार्य करते. सोबतच असे गुणी छात्र सैन्यात भरती करता यावेत यासाठी त्यांना प्रशिक्षित केले जाते. राष्ट्रीय छात्र सेना देशपातळीवर तीन प्रमाणपत्र परीक्षांचे आयोजन करते. महाविद्यालयीन स्तरावर २ वर्षांचे प्रशिक्षणांती बी प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते व उत्तीर्ण छात्रांना बी प्रमाणपत्र मिळते.
दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील कॅडेट्सने बी प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. महाविद्यालयातील 13 कॅडेट्सनी बी प्रमाणपत्र परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले आहे. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते बी सर्टिफिकेट प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष मा. श्री. आरविंद सोनवणे, मा. श्री. ललितभाई शहा, मा. श्री. रमेशकुमार राठी, सचिव मा.श्री. रमेश बियाणी, संयुक्तसचिव मा. श्री. सुरेश जैन व कोषाध्यक्ष मा. श्री. संजय बोरा आदीनी कौतुक केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ प्रदीप सूर्यवंशी, लेफ्टनंट विवेक झंपले,  कार्यालयीन अधिक्षक नवनाथ भालेराव  व प्रा महेश जंगापल्ले इत्यादींनी कॅडेट्सचे अभिनंदन केले.

Skip to content