Dayanand Education Society's

Dayanand College of Arts, Latur

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

डॉ.संदीप जगदाळे यांना ‘रोटरी आदर्श शिक्षक’ पुरस्कार  .

डॉ.संदीप जगदाळे यांना ‘रोटरी आदर्श शिक्षक’ पुरस्कार  .

डॉ.संदीप जगदाळे यांना ‘रोटरी आदर्श शिक्षक’ पुरस्कार  .
     ला.दि. 16.09.19 रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांनच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांना रोटरी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला जातो.यावर्षीचा National Builder Award हा पुरस्कार दयानंद कला महाविद्यालयातील प्रा.डॉ संदीप जगदाळे यांना जिल्हा न्यायाधीश सौ वृषाली जोशी यांच्या शुभहस्ते  प्रदान करण्यात आला.याप्रसंगी सहाय्यक प्रांतपाल रो अँड सतीश दिवाण यांच्यासह लातूर रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.
     डॉ.जगदाळे यांनी 13 पुस्तकांचे लेखन केले आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी अनेक सहशालेय उपक्रम,सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांचे आयोजन केले आहे.
     शैक्षणिक वेबसाईटची निर्मिती,सीडीज व युट्युबवर अनेक व्हिडीओ अपलोड केले आहेत.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी व जिल्हा समन्वयक,अधिसभा सदस्य,राज्य मंडळ सदस्य आशा अनेक प्राधिकारणावर ते कार्यरत आहेत.
     यापूर्वी डॉ जगदाळे यांना केंद्र व राज्य पुरस्कारासह सामाजिक संस्थांकडून 8 पुरस्कार मिळाले आहेत.
     हा पुरस्कारवितरण सोहळा दि 15 सप्टेंबर 2019 रोजी डॉ भालचंद्र ब्लड बँकेत सायं 5 वाजता संपन्न झाला.
     या निवडीबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्षीरमनजी लाहोटी,रामेशजी बियाणी,सुरेशजी जैन,प्रभारी प्राचार्य डॉ एस पी गायकवाड,उपप्राचार्य अनिल माळी,डॉ दिलीप नागरगोजे, यांनी अभिनंदन केले आहे.
Skip to content