चित्रपटातील चांगल्या गोष्टींची अनुभूती आवश्यक
चित्रपाटाचा अस्वाद कसा घ्यावा?
- प्रा. संतोष पाठारे
दि.24 सप्टेंबर-2019
लातूर – दयानंद कलाच्या अॅनिमेशन विभागामध्ये “डिफरंट पर्सपेक्टीव्हस आॅफ सिनेमास अँड अबाऊट स्क्रिप्ट राईटिंग” या विषयावर प्रा. संतोष पाठारे (सचिव, प्रभात चित्र मंडळ, मुंबई तथा सिने अभ्यासक) यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी चित्रपट कसा समजून पाहावा त्याची माध्यमे कोणती? चित्रपटाचा आधार काय असायला हवा? चित्रपटाच्या घटकांची सांगड घालून कशा प्रकारे सिनेमा बनवतात? चित्रपटांमध्ये कथानकाचे काय महत्व आहे व दिग्दर्शकाची काय भूमिका असते? चित्रपटाचा अस्वाद कसा घ्यावा? अशा बऱ्याच मुद्द्यांवर सखोल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी अध्यक्षीय समारोपात फॅशन दुनियेतील होणारे बदल आपण सहज स्विकारतो परंतु एखादा सिनेमा आपल्याला चांगला संदेश देत असेल तर आपण त्याकडे दूर्लक्ष करतो. तसे व्हायला नको, असे ते म्हणाले. प्रास्ताविक मांडताना अॅनिमेशन विभाग प्रमुख दूर्गा शर्मा म्हणाल्या चित्रपटाकडे पाहताना फक्त मनोरंजन न समजून अभ्यासू दृष्टिीने त्याकडे पाहिले पाहिजे असे सांगितले. सेमिनारची यशस्विता ही विद्यार्थ्यांनी अशा सेमिनारचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात व अनुभवात केल्यावरच होईल असे ही त्या म्हणाल्या.
सेमिनारच्या आयोजनाकरीता अॅनिमेशन विभागातील सर्व प्राध्यापक व परिश्रम घेतलेच परंतु या सेमिनारचे आयोजन करण्यास अभिजात फिल्म सोसायटी, लातूर यांनी सहकार्य केले. अभिजात फिल्म सोसायटीचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष डॉ. स्वप्निल देशमुख, सचिव श्री. शाम जैन, कोषाध्यक्ष श्री. धनंजय कुलकर्णी व सदस्य श्री. अभिजीत भूमकर या सेमिनारसाठी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सदर सेमिनारमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन प्रा. निलिमा कुलकर्णी तर आभार प्रा.संतोष काकडे यांनी मानले.