‘स्वत:ला संधी द्या जग तुम्हाला संधी देईल’ अॅड. शैलेश गोजमगुंडे
दि.16 सप्टेंबर-2019
लातूर – लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे दयानंद कला वाहिनीचे उद्घाटन लातूर नगरीचे नाट्यकर्मी अॅङ शैलेश गोजमगुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दयानंद कला महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलाने तसेच नाटयकलेची देवता नटराजाच्या मुर्तीचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद कला वाहिनीचे सदस्य प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांनी मांडले त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेले अॅड. शैलेश गोजमगुंडे यानी मार्गदर्शन केले याप्रसंगी त्यांनी लातूर सारख्या ठिकाणी नाटयक्षेत्रात असलेल्या संधीचे महत्व पटवून दिले. नाटयक्षेत्रातील काम व्यक्तीमत्व विकासासाठी ही पूरक ठरते. पुढे ते म्हणाले की, नाटक माणसाला जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला शिकविते. प्रत्येक विद्याथ्र्याने आपल्या अंगभूत कलागुणांचा शोध घेवून त्याचा विकास केला पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्र.प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले की, दयानंद कला वाहिनीच्या द्वारे कलेच्या क्षेत्रात दयानंद कला महाविद्यालयाने आतापर्यंत भरघोस असे योगदान दिले आहे. तसेच यापुढेही कला वाहिनीद्वारे कलाकार घडविण्याचे काम अविरतपणे चालू राहील अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. सायली कणसे या विद्यार्थीनीने केले. या कार्यक्रमास प्रा. नितीन डोके, डॉ. राऊतराव एस.बी., प्रा. विवेक झंपले, दयानंद कला वाहिनीचे अध्यक्ष ज्योतिबा बडे, सचिव कृष्णा भातलोंढे, इतर सदस्य आणि मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार कृष्णा भातलोंढे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालय अधिक्षक नवनाथ भालेराव, श्री. बालकृष्ण अडसूळ, श्री. मुगळे यांनी सहकार्य केले.