लातूर – येथील दयानंद कला महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे ‘मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन व विस्तारीत व्याख्यान आयोजित केले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा.बालाजी मदन इंगळे असे म्हणाले की, साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून गंभीर जीवन वास्तवाचे दर्शन घडले पाहिजे. समाजात शेतकरी हा सतत उपेक्षित राहिला असून त्याच्याकडे फारसे कुणाचे लक्ष्य दिसत नाही. तरूण पीढीने साहित्य निर्मिती करत असताना समाजातील समस्यांकडे लक्ष्य दिले पाहिजे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस.पी.गायकवाड होते. विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्याथ्र्यांनी साहित्य निर्मितीकडे वळले पाहिजे त्यातून समाजवास्तव मांडले पाहिजे. या मराठी विभाग प्रमुख डॉ.शिवाजी जवळगेकर, मंडळाचे प्रभारी डॉ. गणेश लहाने, डॉ.सुनीता सांगोले, डॉ.सुभाष कदम, प्रा. राजू मोरे व मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश लहाने यांनी तर आभार स्नेहा वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.