*सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळावर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड*
*लातूर* : दि 23- दयानंद कला महाविद्यालयांतर्गत कार्यान्वित असलेल्या सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळावर प्र.प्राचार्य एस . पी. गायकवाड, उपप्राचार्य अनिल माळी ,प्रा .डॉ रामेश्वर खंदारे प्रा सुधीर गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी श्री विष्णू चांदूरे तर उपाध्यक्षपदी कु अश्विनी शेंडगे यांची निवड झाली .श्री शिंदे माधव (सचिव ),श्री आदर्श दहिरे (कोषाध्यक्ष ),कु सुप्रिया पाटील (विद्यार्थिनी प्रतिनिधी ),श्री गायकवाड प्रशांत (प्रसिद्धी प्रमुख ), श्री गायकवाड सचिन ,श्री पवार भरत व श्री हरिदास संदेश यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.
दयानंद कला महाविद्यालय अंतर्गत स्थापन झालेले सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते .मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक खुले व्यासपीठ प्राप्त होते .त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळ उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचे केंद्रस्थान आहे.