दयानंद कला महाविद्यालयात आरो प्लांटचे उद्घाटन संपन्न!
लातूर : माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर शहरासाठी ‘अमृत जल योजना ‘ कार्यन्वित केली आहे. त्या जलवाहिनी वर दयानंद शिक्षण संस्थेने नळ जोडणी घेवून दयानंद कला महाविद्यालयास नळ दिला. नळाला येणाऱ्या पाण्याला आरो प्लांट जोडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याच्या पिण्याची सोय करण्यात आली. दयानंद शिक्षण संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन तद्अनुषंगाने सुविधा पुरविण्यात अग्रेसर असते. प्रस्तुत जलशुद्धीकरण आरो प्लांट साठीही दयानंद शिक्षण संस्थेने लाखो रुपये आर्थिक मदत करून ही योजना कार्यान्वित केली आहे. सदर प्रकल्पास गंगोत्री जलकुंभ
हत्ते नगर लातूर, ईश्वर बाळकृष्ण कुलकर्णी यांचेही योगदान लाभले. त्याबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष मा.अरविंदभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष मा.ललितभाई शहा, मा. रमेशकुमार राठी, सचिव मा.रमेश बियाणी, संयुक्त सचिव मा.सुरेश जैन , कोषाध्यक्ष मा. संजय बोरा यांचे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. शिवाजी गायकवाड, प्राध्यापक ,प्रशासकीय कर्मचारी व संपूर्ण विद्यार्थ्यांनी आभार मानले.
आरो शुद्धीकरण यंत्राच्या उद्घाटन डॅा. प्रदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी , पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. शिवाजीराव जवळेकर,डॉ. सुनील साळुंखे, डॉ प्रदीप सूर्यवंशी ,डॉ रमेश पारवे,प्रा.विवेक झंपले,प्रा.विलास कोमटवाड,प्रा.सुरेश क्षीरसागर,प्रा.महेश जंगापल्ले, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव आदी उपस्थित होते.