Dayanand Education Society's

Dayanand College of Arts, Latur

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

दयानंद कला महाविद्यालयाच्या वेध – 2019 चा प्रकाशन सोहळा संपन्न

दयानंद कला महाविद्यालयाच्या वेध – 2019 चा प्रकाशन सोहळा संपन्न

लातूर- ‘वेध’ 2019 चा ‘खेळ व मानवी जीवन’ ह्या वार्षिकांकाचे प्रकाशन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव मा. श्री रमेशजी बियाणी आणि मा.श्री. हरिकिशनजी मालू यांच्या शुभहस्ते दयानंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्य कक्षात संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड, उपप्राचार्य (क.म.) अनिल माळी, पर्यवेक्षक प्रा. दिलीप नागरगोजे, मुख्य संपादक प्रा. बालाजी घुटे, संपादक सदस्य डॉ. रामेश्वर खंदारे, डॉ. सुभाष कदम, डॉ. शिवकुमार राऊतराव, कार्यालयीन अधिक्षक श्री. नवनाथ भालेराव, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रकाशन सोहळ्यात शै.वर्ष 2018-19 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या बी.ए. पदवी परीक्षेत विद्यापीठात प्रथम आलेल्या  कु. प्रियंका कुलकर्णी व विद्यापीठात तृतीय आलेल्या कु. यशोदा गायकवाड यांचा अनुक्रमे रू. 5000/- व रू. 3000/- रोख स्वरूपात बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

Skip to content