“दयानंद कला महाविद्यालयामध्ये इतिहास विषयातील करिअरच्या संधी या विषयावर व्याख्यान संपन्न”
दि. 12.09.2019
लातूर- अधुनिक काळामध्ये पारंपारिक करिअर बरोबरच संशोधन अधिकारी, मोडीलिपी तज्ञ, ग्ॉलरी संरक्षक, पत्रकार, माहितीअधिकारी, वस्तुसंग्राहलयातील अधिकारी, पर्यटक मार्गदर्शक आणि वेगवेगळया सिव्हील सव्र्हीसेस अशा अनेक संधी इतिहास विषयाच्या विद्याथ्र्यांसाठी उपलब्ध आहेत असे मत प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी व्यक्त केले. दयानंद कला महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने आयोजीत केलेल्या इतिहास विषयातील करिअरच्या संधी या विषयावर कणकवली महाविद्यालय कणकवली येथील इतिहाससंशोधक व प्राध्यापक डॉ. सोमनाथ कदम पुढे बोलताणा असे म्हणाले की, इतिहासासारख्या सामाजिक विषयातून करिअर बरोबरच सामाजीक समतेचे व राष्ट्रवादाचे संस्कार होतात तसेच समता, स्वातंत्र्य ,बंधुत्व व न्याय या उदार मतवादी मुल्यांचे संवर्धन करता येते त्यामुळे इतिहास हा मुलभुत विषय आहे. इतिहासातून सकारात्मक आणि चिकीत्सक दृष्टी प्राप्त होते. शोध व बोध घेण्याची प्रेरणा निर्माण होते. समाजाला नितीमान करण्यासाठी इतिहासासारख्या विषयाची नितांत आवश्यकता आहे. असेही डॉ. सोमनाथ कदम यांनी मत व्यक्त केले आहे. अध्यक्षीय समारोप करतांना इतिहास विभाग प्रमुख, डॉ. रमेश पारवे असे म्हणाले की, 21 वे शतक हे अत्यंत स्पर्धेचे शतक असून या शतकामध्ये विद्याथ्र्याना अपले करिअर घडवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाबरोबरच इतिहास विषय हा देखील अत्यंत महत्वाचा आहे. इतिहासाची जाणीव असलेला माणूसच समाजामध्ये जागृती निर्माण करतो. विद्याथ्र्यांनी महाविद्यालयामध्ये सुरु करण्यात आलेल्या टुर्स आणि टुरीझम या एक वर्षाच्या प्रमाणपत्र कोर्स मध्ये प्रवेश घेऊन या माध्यमातुनही विद्याथ्र्यानी आपले करिअर घडवावे. असेही डॉ. रमेश पारवे यांनी मत व्यक्त केले. इतिहास विभागातील प्राध्यापीका मनिषा अल्टे यांनी सुत्रसंचालन व अभार प्रदर्शन केले यावेळी प्रा. राजू मोरे यांच्यासह अनेक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.