दयानंद कला मध्ये Online Learning Awareness
कार्यशाळेचे आयोजन
लातूर – दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील इनक्युबेशन सेंटर च्या वतीने ‘Online Learning Awareness’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेसाठी तज्ज्ञ साधन व्यक्ती व मार्गदर्शक म्हणून डॉ. रेणूका लोंढे – पवार (संगणकशास्त्र विभाग प्रमुख, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर) या होत्या.
डॉ. रेणूका लोंढे – पवार यांनी मार्गदर्शन करताना Online Learning Courses ची प्रवेश नोंदणी कशी करायची, हे कोर्सेस कसे अभ्यासले पाहिजेत, त्यांची परीक्षा पद्धती, त्यातले बारकावे, कोर्सच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता ध्येय साध्य करण्यासाठी काय परिश्रम करावेत? अभ्यास कसा करावा? तसेच कोर्सेसद्वारे नौकरीची उपलब्धता कशी होऊ शकते हे उदाहरणासह सखोल विवेचन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी विद्याथ्र्यांना Online Learning ची आवश्यकता ओळखून काळानुरूप अद्यावत ज्ञान घेण्यासाठी जागरूक असले पाहिजे अशी भावना व्यक्त केली. तसेच Online Learning करीता विद्याथ्र्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यात येईल असे सांगितले.
प्रस्तुत कार्यशाळेचे आयोजन प्रा.डॉ. सुनीता सांगोले (Incubation Center समन्वयक) यांनी केले. विद्यार्थी व प्राध्यापक यांचा प्रतिसाद लक्षात घेता या कार्यशाळेचे दुसरे सत्र प्रात्यक्षिकासह घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. भरघोस प्रतिसादात कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. प्रशांत मान्नीकर यांनी केले तर आभार प्रा. सुवर्णा लवंद यांनी मांडले.